गणेश साबळे यांच्या मुलाला शिष्यवृत्तीचा ६० हजार रुपयांचा धनादेन प्रदान
डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे सदस्य गणेश बाबुराव साबळे यांची कामगार महामंडळामध्ये नोंदणी केली होती. त्यांच्या मुलाला शैक्षणिक शिष्यवृत्ती ६०,००० हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीतील ' शासन आपल्या दारी' कार्यक्रमात देण्यात आला.
ठाणे कामगार आयुक्त प्रदीप पवार, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कल्याण अनघा सिरसागर, कामगार अधिकारी दीपा भिसे यांच्या हस्ते संघटनेच्या १००० नाका कामगारांना 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमांत गृहउपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्याबद्दल संघटनेचे लक्ष्मण मिसाळ यांनी शासनाचे संघटनेच्या वतीने आभार मानले.यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
