MISS WORLD 2024 : चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ठरली 'मिस वर्ल्ड'

मुंबई: जवळपास २८ वर्षांनंतर भारतात पार पडलेल्या ‘मिस वर्ल्ड २०२४’ हा सोहळा मुंबई, भारतातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने ७१ व्या मिस वर्ल्डचा मुकूट पटकाविला. 



११५ देशांच्या सुंदरींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. लेबनॉनची यास्मिना जायतौन ही पहिली उपविजेती ठरली.  क्रिस्टिना पिस्कोव्हा हिला ७० वी मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्काने क्रिस्टीनला विश्वसुंदरीचा मुकूट दिला. क्रिस्टिना कायदा आणि व्यवसाय या दोन्ही विषयांमध्ये ड्युअल डिग्री घेत आहे. तिच्या सोशल मीडियानुसार, तिने Krystyna Pyszko Foundation ची स्थापना केली आहे. क्रिस्टिना मॉडेल म्हणूनही काम करत आहे. तिने टांझानियामध्ये वंचित मुलांसाठी इंग्रजी शाळा उघडली, जिथे तिने स्वयंसेवा देखील केली.

 ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ ‘मिस वर्ल्ड’ विजेत्या देखील यात होत्या. चित्रपट निर्माता करण जोहर आणि माजी मिस वर्ल्ड मेगन यंग यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर शान, नेहा कक्कर आणि टोनी कक्कर या गायकांनीही उत्तम परफॉर्मन्स दिला.

 २८ वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या भारताचे प्रतिनिधित्व २२ वर्षीय सिनी शेट्टीने केले होते.  तिने टॉप ८ मध्ये आपले स्थान निर्माण केले होते.  मुंबईत जन्मलेल्या सिनी शेट्टीला २०२२ मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा ताज मिळाला होता.  मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेत तिला टॉप ४ मध्ये स्थान मिळवता आले नाही.



Post a Comment

Previous Post Next Post