दि वा, (आरती मुळीक परब): बारावी, दहावीच्या परिक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना परिक्षेचा भयंकर ताण येतो. हाच ताण कमी होऊन त्यांना आपली हिंदू संस्कृती समजण्यासाठी अखिल ट्युटोरिअलच्या अखिलेश सिंह सरांकडून दिद्यार्थ्यांचे औक्षण करून आशीर्वाद देण्यात आला.
आता सर्वजण नवनविन गोष्टी शिकत असताना जुन्या गोष्टी, जुने संस्कार आपण विसरत चाललो आहोत. पूर्वी परिक्षेला जाताना मुलांना औक्षण केले जायचे नंतर हातावर खाण्यासाठी दही दिले जायचे. हे संस्कार मागे पडत गेल्याने मुलांना त्याचे महत्व माहिती नाही. पण हे संस्कार अखिलेश रामनरेश सिंह यांनी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये रुजवले आहेत. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम ही विद्यार्थ्यांमध्ये त्यांना दिसत आहेत.
दिव्यातील या एकमेव अखिल ट्युटोरिअल क्लासमध्ये बारावी, दहावीच्या मुलांचे विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती देवीच्या समोर अखिलेश सरांकडून औक्षण केले गेले. त्यावेळी विद्यार्थ्यांना ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला औक्षण केल्याने बरे वाटले, अशी आनंदी भावना व्यक्त केली. या औक्षणामुळे आम्हा सर्वांना आशिर्वाद मिळाल्याने नक्कीच आम्ही चांगले मार्क परिक्षेत काढू, असे त्यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.
सिध्दी मोंडकर, सिमा मुल्या, शिवम साधूखा या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना औक्षण केले. त्यावेळी पिरक्षेला खाऊन जावा, पेन, पेन्सिल असे सर्व सामान नीट न्या, वर्गात एकाच जागी बसा, चुळबुळ करु नका.जेवढं येत तेव्हढ लिहा, परिक्षेचा ताण घेऊ नका अशा बऱ्याच टिप्स शिक्षकांनी मुलांना दिल्या.