अलिबाग ( धनंजय कवठेकर): शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पेझारी येथे जाऊन आ. जयंत पाटील, माजी आ. पंडीत पाटील, मिनाक्षी पाटील यांचे सुपूत्र शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील आदी पाटील कुटंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, पिंट्या ठाकूर, हेमंत पाटील, किशोर जैन, दर्शना पाटील, अविनाश पाटील, चंद्रहास पाटील, नरेश म्हात्रे आदी मान्यवर, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अर्थ सभापती चित्रा पाटील, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, शैला पाटील, नृपाल पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, सुरेश खोत, दीपक पाटील आदी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.