डोंबिवली ( शंकर जाधव ) : स.वा.जोशी शाळेच्या पटांगणात पार पडलेल्या राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेत केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठ, ले उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा जो काही निर्णय घेतला आहे. तो योग्य ठरवत शिर्डीसाठी माझा आग्रह होता, मात्र शिर्डीची जागा सोडता आली नाही. त्याचबरोबर आरपीआय महायुतीत असून महायुतीत जागेची अडचण होती. पण बाकीचे जी काही आश्वासन दिले ते आश्वासन ते पाळतील असे आम्हाला आशा असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा योग्य निर्णय घेतला. वंचितने प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाविकास आघाडी यांना विकास करता आला नाही, गेल्या दहा वर्षात बदल जाणवतोय, देशासाठी नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे आठवले म्हणाले, मी योग्य दिशेने पुढे चाललोय त्यमुळे तरुणांनी माझ्यासोबत यावं, बीजेपीसोबत असलो तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर अशी युती केली आहे. एकट्याच्या ताकदीवर सत्तेत येणं शक्य नसेल तर मित्र पक्षाच्या ताकदीवर पुढे आले पाहिजे. इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवण्याचे काम करते. भारत जोडो यात्रा काढत भारत तोडण्याचे काम करत आहे. भाजपा मध्ये परिवर्तन झाले. आत्ताचा भाजप बदललाय, भाजप हा सर्व जाती धर्मपंथांचा पक्ष आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा विश्वास देखील बोलून दाखवला. आरपीआय महायुतीत आहे जागेची अडचण होती. शिर्डीसाठी माझा आग्रह होता, मात्र शिर्डीची जागा सोडता आली नाही. पण बाकीच्या जे काही आश्वासन दिले ते आश्वासन ते पाळतील असे आम्हाला आशा आहे. मनसे काय अद्याप महायुतीत आलेले नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडण्याचा निर्णय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक या आधीचे विषय मिटवले आहे. अमरावती लोकसभा मतदार संघाबाबत बच्चू कडू यांच्याशी बोलणार असून त्यांचे नाराजी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड, स्वागताध्यक्ष आयु.माणिक उघडे, कार्याध्यक्ष अशोक पगारे, सचिव आयु.गुणाजी बनसोडे, किशोर मगरे, ननंदा लोखंडे, मीना साळवी, खजिनदार प्रमिला सावंत, जय जाधव, माजी नगरसेवक महेश पाटील आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भन्ते महाथोरो ज्ञानज्योती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.