अद्ययावत क्रीडासंकुले शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट

     

  जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे मत

  डोंबिवली ( शंकर जाधव ) : सोयी सुविधा असल्या तरच त्या संधी निर्माण होतात. त्यामुळे या सोयीसुविधांचा फायदा काही वर्षांनी दिसू शकेल.अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकतील. त्या अशा सुविधा असणे आवश्यक आहे. डोंबिवलीकरांसाठी हे अतिशय चांगली संधी याचा लाभ घ्यायला हवा.अशी सर्वांगीण वाढ करू देणारी शहरे फार कमी आहेत. अशा सुविधा होत असतील तर निश्चितच शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असल्याचे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

   डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने डॉ. यु. प्रभाकर राव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डोंबिवली एमआयडीसी येथे अद्ययावत क्रीडासंकुलाची निर्मिती केली. त्या क्रीडासंकुलाच्या उद्घाटनप्रसंगी गोखले बोलत होते. यावेळी पत्रकार गिरीश कुबेर, विवेक सावंत, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई, सचिव डॉ. प्रशांत राव, पत्रकार विनोद शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर म्हणाले, माझ्यासाठी व्यतिगत हा महत्वाचा क्षण आहे.कारण मूळचा डोंबिवलीकर असून या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो.

१९७९ साली सुरू झालेल्या सुरू झालेल्या या महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील प्रवेश मिळविणारा मी विद्यार्थी होतो. त्यामुळे या महाविद्यालया संबंधी काही होत असेल तर तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. डोंबिवली शहरात इतक्या उच्च दर्जाच्या सुविधा येत आहे या कौतुकास्पद आहे.मी डोंबिवली सोडली त्यावेळची हे शहर नी आता पुन्हा डोंबिवलीत राहायला याव आणि या महाविद्यालयात प्रवेश करावा अस वाटत.

  एका क्षेत्रामध्ये नुसतच काही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन चालत नाही.पुढच्या पिढीसाठी सर्व क्षेत्राला सर्वांगीण वाढ होऊ शकेल आशा सुविधा असाव्या लागतात तर शहर हे आपलं वाटत.एकेकाळी अनेक पिढ्यानी डोंबिवली सोडण्याचा निर्णय घेतला होता.कारण काहीही नव्हतं अशी एक भावना होती.आता डोंबिवली शहरात बरच काही आहे. त्यामुळे अनेकांना पुन्हा एकदा या शहराची ओढ निर्माण होऊ शकेल.अशा सोयी सुविधा असल्या तरच त्या संधी निर्माण होतात. त्यामुळे या सोयीसुविधांचा फायदा काही वर्षांनी दिसू शकेल.अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकतील.त्या अशा सुविधा असणे आवश्यक आहे.डोंबिवलीकरांसाठी हे अतिशय चांगली संधी याचा लाभ घ्यायला हवा.अशी सर्वांगीण वाढ करू देणारी शहरे फार कमी आहेत.अशा सुविधा होत असतील तर निश्चितच शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. 

सरकार काही करू शकत हे मुळात अविश्वनिय आहे.सरकारने सरकार चालवल तरी खूप आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले तरी पुरेसे आहे. जे सर्व खाजगी सहभागातून होणे अपेक्षित आहे.कारण त्यासाठी ज्यांना या शहरावरती प्रेम आहे, जे कुठले शहरात असतील , डॉ. रावासारखी कुटुंबिय असतील त्यांची पहिली पिढी जी या शहरात होती आणि त्यांच्या पुढील पिढीलाही अस करावंसं वाटत असेल.सरकारकडे सरकार चालवायला वेळ नसतो आणि ऊर्जा नसते.सुविधा असणं महत्वाच आहे. सद्या शिक्षण क्षेत्राला फार मोठं आव्हान असेल ना तर ते पालक नावाच्या संस्थेचे आहे. आहे त्या सुविधांचा वापर कसा करता त्यावर प्रगती किंवा अधोगती अवलंबून असते.संधी नाही , सोयीसुविधा नाही याला काही अर्थ नसतो. या नकारात्मक गोष्टी या तुम्हाला संगण्यासाठी असतात.ज्यांना काही करायचे नसते त्यांच्यासाठी हा बहाणा असतो. या सुविधांचा वापर करून आहे त्या परिस्थितीत अनेक गोष्टी करता येऊ शकतात.तर संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई म्हणाले,मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं होते की या जीवनाचा हे माझं फार महत्वाच आहे की पालकांना व विद्यार्थाना सुख सोयी करून दिल्या आहेत.

   आताची मुले समाज माध्यमे, क्रमिक अभ्यासक्रमात गुंग आहेत. मैदानी खेळांसाठी अशा मुलांची मानसिकता तयार करण्यासाठी क्रीडासंकुलांची खूप गरज आहे. हे काम पेंढरकर महाविद्यालय माध्यमातून पूर्ण होत आहे. दुर्गम भागातील मुले सुविधा नसताना ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारतात. दुर्गम भागात अशा सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे असे गोखले यांनी सांगितले.  सदर कार्यक्रमाला व्यवस्थापक सदस्य उमेश पटवारी, डॉ. आनंद आचार्य, डॉ. प्रदीप राव, डॉ. सुचित्रा कामथ आदी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post