मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) २०२४ निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बोर्डाने (HSC) १२ वीचा निकाल उद्या २१ मे २०२४ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेत १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. दुपारी १ वाजता निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहेत.
१२वीचा निकाल पाहण्याचे संकेतस्थळ
- mahresult.nic.in
- hscresult.mahahsscboard.in
- mahahsscboard.in
- msbshse.co.in
- hscresult.mkcl.org
निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना वर नमूद केलेल्या वेबसाइटवर त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागेल.विद्यार्थी ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.
.jpeg)