प्रबोधनकार ठाकरे कॅरम स्पर्धेत सज्जाद शेख व शेरॉन अल्वारिसची बाजी


मुंबई, (ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत) :  छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विलेपार्ले व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने या संकुलाची निर्मिती करणारे मुंबईचे माजी महापौर /माजी आमदार डॉ. रमेश य. प्रभू यांच्या ८५ व्या जनमदिनाचे औचित्य साधून कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे

पुरुष गटात सज्जाद शेखने (पि ॲण्ड पि )  अंतिम फेरीत वाजिद अन्सारीचा २५-१० ' २५-१६ पराभव केला. महिला गटात अंतिम फेरी शेरॉन अल्वारिसने ( CSMS S ) जयमाला परबचा ( बोरिवली स्पोर्टस) २५ -१५ ' १२ -२५, २५ - १२ चुरशीच्या लढतीत पराभव केला.

बक्षिस समारभांच्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन अ. राणे – व मकरंद येडूरकर विश्वस्त. तसेच मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष प्र. चव्हाण, रमेश चव्हाण,  संजय मणियार –उपाध्यक्ष, गौतम जाधव – खजिनदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post