Maharashtra hsc result 2024 : १२ वी परीक्षेत मुलींची भरारी


  • ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण
  • मुलांची टक्केवारी ९१.६० टक्के
  • ९७.५१ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल
  • मुंबई विभाग ९१.९५ टक्क्यांवर 

मुंबई: महाराष्ट्रातील इयत्ता १२वी (HSC परीक्षा निकाल २०२४) चा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. यंदाच्या निकालात ९३.३७ टक्के विद्यार्थी १२वी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर कोकण विभागाने आपल्या उच्चतम निकालाची परंपरा कायम राखली आहे. मुंबई विभाग ९१.९५ टक्क्यांसह तळाला आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या माहितीनुसार, यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींनी पुन्हा एकदा मुलांचा पराभव केला आहे. यावेळी ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के इतकी आहे. मात्र, यंदा महाराष्ट्र बोर्ड टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

कोकण विभाग पुन्हा सर्वोत्तम 

 यावेळीही कोकण विभागाचा निकाल सर्वोत्तम लागला आहे. ९७.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभाग ९१.९५ टक्क्यांसह तळाला आहे. याशिवाय नाशिक विभागात ९४.७१ टक्के, पुणे विभागात ९४.४४ टक्के, कोल्हापूर विभागात ९४.२४ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ९४.०८ टक्के, अमरावती विभागात ९३ टक्के, लातूर विभागात ९२.३६ टक्के, नागपूर विभागात ९२.१२ टक्के निकाल लागला आहे.

 महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, लातूर, नाशिक, कोकण आणि कोल्हापूर या नऊ विभागांतून एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी १२वी बोर्डाची परीक्षा दिली होती. ज्यामध्ये १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 


Post a Comment

Previous Post Next Post