सूर्या प्रकल्पादरम्यान खोदकामात माती खचली


पालघर  : पालघर येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पात माती आणि भिंत कोसळली.यामध्ये एक मायनिंग मशीन ऑपरेटर अडकला आहे. बुधवारी रात्रीच्या दरम्यान बोगद्याचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोगद्याच्या शाफ्टचे खोदकाम सुरू असताना मायनिंग मशीन वरतीीच माती आणि भिंत कोसळली. या अपघातामुुुळे मशिन ऑपरेटर ढिगाऱ्यात अडकला. 

एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी इतर स्थानिक एजन्सींसह बचावकार्य सुरू केले. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (MMRDA) उपक्रम आहे. MMR प्रदेशात सतत वाढणाऱ्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 

 या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि आसपासच्या भागात ४०३ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी दिले जाते. याअंतर्गत वसई आणि विरारमधील लाखो रहिवाशांना लाभ मिळणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post