शिवसैनिक संदेश पाटील यांनी केले सहकार्य
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एका तरुणीने रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉक्टरांच्या परवानगीने मतदान केंद्रापर्यत रुग्णवाहिकेतून आली. तरुणीला शिवसैनिक संदेश पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
लोकसभेच्या निवडणुकीत तरुण वर्ग उत्सुक असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले. डोंबिवली पश्चिमकडील प्रणाली महेंद्र साळुंखे ही तरुणी गेले सहा दिवस रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र आपले मतदान वाया जाऊ नये म्हणून या तरुणीने शिवसैनिक संदेश पाटील यांना संपर्क साधला.मला मतदान करायचे आहे अशी इच्छा तरुणीने व्यक्त करताच पाटील यांनी रुग्णवाहिक उपलब्ध केली. मतदान केंद्रापर्यत रुग्णवाहिकेतून तरुणी आली आणि तिने मतदानाचा हक्क बजावला.
