Five Indian Blue Women of Victory in Bangladesh: बांगलादेशमधील विजयात चमकलेल्या पाच भारतीय ब्लू वुमन्स



भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत ५-० बांगलादेशचा व्हाईटवॉश केला.भारतीय महिला संघाचा मागील प्रदर्शन पाहता, त्यांच्या विजयाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र भारतीय महिला संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. या पाच सामन्यांत कोणत्या पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला त्यांचा घेतलेला आढावा.



 
स्मृती मंधाना 
 स्मृतीच्या नावाशिवाय भारतीय महिला क्रिकेटपटूंची यादी अपूर्ण असेल. या स्टायलिश लेफ्टहँडरने पाच सामन्यांत ११६ धावा करून या मालिकेत सर्वाधिक धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताची सुरुवात चांगली करण्यात स्मृतीने आणि शेफालीने मोलाची भूमिका बजावली आहे. स्मृतीने एका बाजूने आक्रमक आणि संयमी खेळ करत भारतीय संघाच्या विजयात महत्वाचा हातभार लावला.




 दयालन हेमलता
भारताकडून तिसऱ्या स्थानावर खेळते. दयालन हेमलताने या मालिकेत मधल्या षटकांमध्ये धावफलक हलता ठेवून प्रशंसनीय कामगिरी केली आणि विजयात उपयुक्त योगदान दिले. तिने सन्माननीय ३६.३३ सरासरी आणि १४१.५६ स्ट्राइक रेटसह स्मृतीनंतर दुसऱ्या स्थानावर १०९ धावा काढण्यात यश मिळवले.




रिचा घोष 
भारतीय संघात यष्टीरक्षकासोबत फलंदाजाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळते. तिने केलेला उत्कृष्ट खेळ या मालिकेत महत्त्वाचा ठरला.
मधल्या फळीतही उपयुक्त धावा काढण्यात तिला यश आले. ४१.५ च्या सरासरीने आणि १४०६८ च्या स्ट्राइक रेटसह, रिचाने संस्मरणीय खेळ केला. तिचे प्रदर्शन भारतासाठी तसेच या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे.




राधा यादव 
डावखुरी फिरकीपटू राधा यादवने या मालिकेत शानदार प्रदर्शन केले. तिने केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे तिला प्लेअर ऑफ द सिरीज च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अचानक झालेल्या पावसामुळे खेळपट्टीत बदल झाले होते, त्याचा फायदा घेत राधाने बांगलादेशी महिला खेळाडूंना अडचणीत टाकले. राधाच्या फिरकी गोलंदाजीचे बांगलादेशी महिलांकडे कोणतेही उत्तर नव्हते. तिने संपूर्ण मालिकेत १० विकेट्स घेण्यास यश मिळविले.




आशा शोबाना 

वयाच्या ३३ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवलेल्या आशा शोबाने अतिशय कठोर परिश्रम केले आहे. तिची कहाणी सर्व महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंसाठी, विशेषत: महिला क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहे. या मालिकेतून भारतीय संघात स्थान मिळविल्यानंतर तिने दोन सामन्यात चार विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.  टी २० विश्वचषक येत असल्याने, तिच्या संघातील समावेशाने एक मजबूत संघ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. 



बांगलादेश दौरा आटोपल्यानंतर, भारत जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे, एक कसोटी आणि ३ टी-२० अशा सर्व फॉरमॅटच्या दौऱ्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसत आहेत. 

 

Post a Comment

Previous Post Next Post