डोंबिवली ( शंकर जाधव ) : नागरी संरक्षण दल, नवी मुंबई, समूह ठाणे यांच्या वतीने शुक्रवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने नागरिकाना आणि शालेय विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून सांगणे आणि योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगा बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संघटनेचे अधिकारी व स्वयंसेवक यांनी सकाळी ७ ते ८ या वेळेत विनायक सभागृह, गणेश मंदिर संस्थान, फडके रोड, डोंबिवली पूर्व येथे नागरिकांसाठी तर सकाळी ११ वाजता सोनारपाडा जिल्हा परिषद शाळा, सोनारपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
योग दिन साजरा करण्यासाठी नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे,चे उपनियंत्रक विजय जाधव यांचे आदेशानुसार व सहाय्यक उप नियंत्रक दिपा घरत यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी व कमलेश श्रीवास्तव तसेच विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी ( योगा मास्टर), डॉ. राहुल घाटवळ , अशोक शेनवी, सौ विद्या गडाख, सगीर खान यांचे सह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शिक्षक यांचेसह काही पालकांनी देखील शिबिरात सहभाग घेतला. सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सोनारपाडा येथील ग्रामस्थ व कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संघटनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले बद्दल आभार मानले.