आंबेघर- तोरणपाडा येथील धवलारीन गं.भा. लक्ष्मीबाई गोपाळ पाटील यांचे निधन

 



अलिबाग, : तालुक्यातील माणकुले ग्रामपंचायत हद्दीतील बहिरीचापाडा या गावच्या मुळ रहिवासी आणि सध्या राहणार वाघोडे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेघर - तोरणपाडा येथे राहणाऱ्या गं.भा. लक्ष्मीबाई गोपाळ पाटील (वय ९५) यांचे २० जून २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर आंबेघर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

        लग्नसमारंभातील धवलारीन म्हणून त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होत्या, तसेच त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्वांना परिचित होत्या. एखाद्या लग्नसमारंभात त्यांचे नृत्य पाहून उपस्थित मंडळी थक्क व्हायची. बहिरीचापाडा असो किंवा स्थलांतर झाल्यानंतर आंबेघर - तोरणपाडा असो, त्यांचा गावच्या सर्व उपक्रमात हिरीरीने सहभाग असायचा. गेल्या काही महिन्यांपासून त्या‌ आजारी होत्या. याकाळात विविध समाजातील नागरिकांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू, पणतू, तीन विवाहित मुली, जावई, तीन विवाहित नाती, नात जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.        

        त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ्या प्रमाणात सर्व थरातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post