डोंबिवली ( शंकर जाधव ).आगरी युथ फोरम,डोंबिवली यांच्या विद्यमाने सन २०२३ व २०२४ शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण पदवी,पदविका धारण केलेल्या शिवाय प्रावीण्य मिळवलेल्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील होरायजोन सभागृह येथे संपन्न झाला.
३४ वर्षापासूनआगरी युथ फोरम,डोंबिवली या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवारी २७ तारखेला पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यासह आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री,सद्गुरू सावळाराम महाराज यांचे नातू ह.भ. प.चेतन महाराज म्हात्रे,जगन्नाथ महाराज म्हात्रे,प्रमुख उपस्थिती मध्ये बाळकृष्ण महाराज पाटील,जयेश महाराज भाग्यवंत,जनार्दन महाराज पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे,गणेश महाराज ठाकूर,अनंता महाराज पाटील,बबन महाराज म्हात्रे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे,उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ,कार्याध्यक्ष जालिंदर पाटील,सरचिटणीस रामकृष्ण पाटील,चिटणीस प्रकाश भंडारी,खजिनदार पांडुरंग म्हात्रे,कार्यकारी सदस्य शरद पाटील,गुरुनाथ म्हात्रे,संतोष संते,जयेंद्र पाटील,सदस्य सदानंद म्हात्रे,भानुदास भोईर,कांता पाटील,विनायक पाटील,नारायण म्हात्रे,अनंता पाटील,अशोक पाटील,प्रवीण पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गुलाब वझे म्हणाले, विद्यार्थ्यांनी खूप शिकून मोठं झाले पाहिजे. आपल्या समाजातील अनेक विद्यार्थी शिकून मोठी झाली आहेत.
