डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान केल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता कल्याण- डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या आदेशानुसार 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पवार आणि फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख आणि कर्मचारी यांनी फेरीवाल्यांवर कारवाई केली.
या कारवाईत सातत्य ठेवत शनिवारी २७ तारखेला फेरीवाल्यांवर कारवाई करत फेरीवाल्यांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलीस बंदोबस्त ठेवल्यात आला होता. पालिकेची कारवाई सुरु होताच फेरीवाल्यांची पळापळ सुरु झाली. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत समान जप्त केले.पालिकेची करावाई पाहून डोंबिवलीकरांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले.