आषाढी एकादशीनिमित्ताने मापगांव येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन

 



सोगाव, ( अब्दुल सोगावकर ) : आषाढी एकादशी निमित्ताने अलिबाग तालुक्यातील मापगांव येथील ग्रामस्थांनी विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.

        यावेळी लहान मुलांनी  विठ्ठल - रखुमाईची आकर्षक वेशभूषा परिधान करून विठ्ठल नामाच्या व टाळ्यांच्या गजरात मापगांव कुंभार आळी मधील श्री मुरलीधर मंदिरात आरती केल्यानंतर संपूर्ण मापगांव गावातून निघालेली भव्य दिंडी मापगांव येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आल्यानंतर समाप्त झाली. या दिंडी सोहळ्यात मापगांव येथील लहान मुले, मुली, महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

Previous Post Next Post