सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सीए योगेश ठोंबरेचे केले अभिनंदन

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवलीजवळील खोणी गावात राहणाऱ्या भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरे यांच्या मुलगा योगेश हा सीए झाल्याने त्यांचे ठाणे जिल्ह्यात कौतुक होत आहे. 


बुधवारी १७ तारखेला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघांचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी खोणी गावात जाऊन योगेशची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण जिल्हा सचिव पंढरीनाथ म्हात्रे, डोंबिवली ग्रामीण मंडळ सरचिटणीस धनाजी पाटील उपस्थित होते.मंत्री चव्हाण यांनी योगेशला शुभेच्छा देत त्याच्या पाठशी नेहमी आहोत असे सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post