पोलीस व पालिका प्रशासनाची संयुक्त कारवाई
डोंबिवली ( शंकर जाधव ) : पोलीस ठाण्याला हाकेच्या अंतरावर रस्त्यावर दारूची पार्टी करणाऱ्यांवर पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत दारुड्यांना चोप दिला. मंगळवारी सायंकाळी वाईन शॉप समोरील उघड्यावरील विक्री करत असलेल्या खाद्यपदार्थ फेरीवाल्यांवर कारवाई करत हटविले.
पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार डोंबिवली सहायक आयुक्त परिमंडळ - २ हेमा मुंब्ररकर, 'ग'प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त संजय कुमावत, 'फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशानुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी पालिका कर्मचारी, पोलीस बंदोबस्ततात डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील शॉप समोर कारवाई करण्यात आली. वाईन शॉपसमोरील कट्ट्यावर बसून दारू पिणाऱ्या दारुड्यांना चोप देत हाकलावून देण्यात आले. तर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
फेरीवाल्यांचे समान जप्त करण्यात आले. तर समोरील कट्यावर अनधिकृत बांधलेली टपरी तोडण्यात आली. पालिका व पोलिसांची कारवाई सुरू असताना डोंबिवलीकरांनी पालिका व पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. या कारवाईत सातत्य राहावे असे डोंबिवलीकर म्हणत होते.