प्रत्येक राज्यात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवण्याचा 'वे टू कॉज फाऊंडेशन'चा संकल्प

 



एक बंधन, रक्षाबंधन' उपक्रमाची डोंबिवली पश्चिम स्टेशन  परिसरात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवून शुभारंभ


सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  भारतीय सैन्यदलातील आपले वीर बांधव आपल्या भारतमातेचे दिवसरात्र संरक्षण करत आहेत. या बांधवांप्रति आपल्या सर्वांच्याच मनात एक आपुलकीचे बंधन असते. हेच बंधन जपण्यासाठी डोंबिवलीतील रोहित आचरेकर यांचा वे टू कॉज फाऊंडेशन आणि वे टू कॉज रायडर्स क्लब गेल्या १८ वर्षांपासून 'एक बंधन, रक्षाबंधन ' यांनी उपक्रम राबवित आहे. बुधवारी १७ तारखेला  डोंबिवली पश्चिम येथील स्टेशन रोड परिसरात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवून उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आचरेकर यांना शुभेच्छा दिल्या.




   या उपक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचा स्वातंत्र्यदिन आणि त्यानंतर येणारे रक्षाबंधन सैनिकांसोबत साजरा करण्यात येणार आहे.कारगिल युद्धातील भारताच्या विजयाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वे टू कॉज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित आचरेकर यांच्या नेतृत्वात १७ जुलै ते १९ ऑगस्ट २०२४ दरम्यान डोंबिवली ते लडाख प्रांतातील कारगिल वॉर मेमोरियल अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.यंदा हा उपक्रम आपल्या डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून होत आहे. 




        यावर्षीच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अखंड भारतातील प्रत्येक राज्यात ७७ स्क्वेअर फूट ध्वज फडकवण्याचा वे टू कॉज फाऊंडेशनचा संकल्प आहे.तर स्वातंत्र्यदिनी लडाख येथे ७७ फूटचा ध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक राज्यातून सैनिकांसाठी राख्या गोळा करण्यात येणार आहेत. यासाठीचे संपूर्ण नियोजन वे टू कॉज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. देशभक्ती आणि आपुलकी जागवणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून हा उपक्रम वर्षानुवर्षे असाच सुरू रहावा, असे म्हणत या उपक्रमाला डोंबिवलीकरांनी शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post