युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली पाहणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीकरांना दिलासा देणारा माणकोली पुलावरून वाहतूक सुरू झाली असली तरी डोंबिवलीतील वाहतुकीवर परिणाम होत आहे. शहरातील वाहतूककोंडी वाढत असल्याने कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेने तयार केलेल्या वाहतूक आराखडाप्रमाणे दिवा - वसई रेल्वे लाईनच्या खालून दोन बोगदे तयार केले जाणार आहे. रिंगरूटपर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार झाला नाही. या रस्त्याची युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी महारेलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक कुमार अनुराग ठेकेदार, संबंधित ठेकेदार व ग्रामस्थ यांच्यासह पाहणी केली.
यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीत रिंगरूटचे काम सुरू आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव मानकोली पूल झाल्यानंतर रिंगरूट हा महत्त्वाचा टप्पा आहे. रिंगरूटमध्ये सर्वात मोठा अडथळा असलेला रेल्वेच्या दिवा- वसई लाईनच्या खाली जो अंडर पास होता त्याला निधी देखील पास आहे. पण ज्या अंडरपाससाठी पर्यायी रस्ता नव्हता. त्या पर्यायी रस्तासाठी रेल्वेचे अधिकारी मोठा गावाचे ग्रामस्थ आणि आम्ही पाहणी केली.रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे. मोठा गाव ते दुर्गाडीमधून जाणारा जो रिंगरूटचा अडथळा दूर होणार आहे.
