IMD: १२२ वर्षांनंतर उत्तर-पश्चिम भारतात जूनमध्ये सर्वात अधिक उष्णता



 या महिन्यात सामान्यपेक्षा ११ टक्के कमी पाऊस 


नवी दिल्ली :  बदलते हवामान आणि विविध कारणांमुळे जून २०२४ मध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे.  हवामान खात्याने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जूनमध्ये ११ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.  आयएमडीने नमूद केले आहे की जून महिन्यात देशात सरासरी १६५.३ मिमी पाऊस पडतो, परंतु यावर्षी केवळ १४७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  २००१ नंतर जून हा सातवा महिना कमी पावसाचा महिना ठरला आहे.  गेल्या पाच वर्षांत कधीही जूनमध्ये ११ टक्के कमी पाऊस झालेला नसल्याचे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात मान्सूनची साधारण नोंद करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये कमकुवत मान्सूनमुळे पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम भारतात तीव्र उष्णतेचा प्रभाव आणखी वाढला आहे.


हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ११ जून ते २७ जून या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूणच सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. IMD नुसार, वायव्य भारतात ३३ टक्के कमी पाऊस झाला, तर मध्य भारतात १४ टक्के घट झाली. पूर्व आणि ईशान्य भारतात १३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. एकट्या दक्षिण भारतात १४  टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.


 आयएमडीने सांगितले की, चार महिन्यांच्या मान्सून हंगामात देशात एकूण ८७ सेमी पाऊस झाला आहे. यामध्ये जून महिन्यात १५ टक्के पाऊस झाला आहे. ३० मे रोजी केरळ आणि ईशान्य भारताच्या भागात मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले होते. त्याआधारे पाऊस चांगला होईल, असा अंदाज होता. मात्र, ही आकडेवारी समोर आल्यानंतर ११टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ११ जून ते २७ जून या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूणच सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.


IMD नुसार, ५० टक्के भागात अत्यल्प पाऊस झाला. गेल्या २५ वर्षांपैकी २० वर्षे अशी आहेत जेव्हा जून पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी (दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा (LPA) ९२ टक्के कमी) नोंदवले गेले. या सरासरीच्या आधारे, गेल्या २५ वर्षांपैकी २० वर्षांमध्ये, जुलैमध्ये पाऊस सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त होता. गेल्या २५ पैकी १७ वर्षांमध्ये जूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला.  गेल्या एका महिन्यात पाऊस कमी झाल्याच्या बातम्यांसोबतच देशातील काही राज्यांमध्ये अचानक हवामान बदल आणि ढगफुटीच्या घटनाही समोर आल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी, पाऊस न पडणे, कमी पाऊस अशा परिस्थिती निर्माण होत आहेत.


दिल्लीत जूनमध्ये सरासरी ७४.१ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, यावेळी २८ जून रोजी तिप्पट पाऊस झाला. दिल्ली-एनसीआरमध्ये एका दिवसात जवळपास २२८ मिमी पावसाने ८८ वर्षांचा विक्रम मोडला आणि १९३६ नंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस जूनमध्ये झाला.  IMD नुसार, एका दिवसात १२४.५ ते २४४.४ मिमी पाऊस हा 'अत्यंत जोरदार पाऊस' म्हणून गणला जातो.




Post a Comment

Previous Post Next Post