Kdmc education: केडीएमसी महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सप्ताहाचे आयोजन



कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या शाळांमध्ये दि.२२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  यासंदर्भात मनपा शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी सर्व सी. आर. सी. प्रमुखांची ऑनलाईन आढावा सभा घेवून हा उपक्रम यशस्वीरित्या राबविणे संदर्भात मार्गदर्शन केले.

  शिक्षण सप्ताहात सात दिवसांमधील उपक्रम असे 

 अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशनलाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम दिवस, समुदाय सहभाग दिवस या सारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. उपक्रम कालावधीत दररोज दोन ते तीन शाळाभेटी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, आय ई कोऑर्डिनेटर, विषयसाधनव्यक्ति, समावेशित साधनव्यक्ती व रिसोर्स टिचर्स यांना आदेशित करण्यात आलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post