Shampoo in cocaine : मुंबई विमानतळावर २० कोटींच्या कोकेनसह महिला अटकेत





मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी नैरोबी येथून मुंबई विमानतळावर आलेल्या एका महिलेकडून शॅम्पूच्या बाटलीत २० कोटीचे कोकेन  द्रव स्वरूपात हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी तस्करी करणाऱ्या प्रवासी महिलेला अटक करण्यात आली आणि तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत आली आहे. 


   नैरोबीहून मुंबई विमानतळावर आलेल्या एका महिलेच्या सामानाची तपासणी केली असता त्या महिलेच्या सामानात असलेल्या २ शॅम्पू/लोशनच्या बाटल्यांमध्ये १९८३ ग्रॅम वजनाचे कोकेन हस्तगत करण्यात आले. अमली पदार्थांच्या तस्करांनी विशिष्ट पद्धतीच्या मदतीने द्रव स्वरूपातील कोकेन शॅम्पू/लोशनच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवले होते. या द्रव पदार्थाचे स्वरूप देखील शॅम्पू/लोशन सारखेच  असल्यामुळे ते सहज ओळखण्यास अडचण होईल या उद्देशानेच ते द्रव स्वरूपात लपविण्यात आले होते. या अमली पदार्थाची किंमत अंदाजे २० कोटी इतकी आहे.





Post a Comment

Previous Post Next Post