Maratha reservation: मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावावी

Maharashtra WebNews
0


शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन 


पुणे : महाराष्ट्रातील मराठा-ओबीसी कोट्याच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) नेते शरद पवार यांनी सोमवारी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावरील ५० टक्के कोट्याची मर्यादा काढून टाकण्याचे धोरण केंद्राने आणल्यास विरोधक सहकार्य करतील. त्याचबरोबर राज्य पातळीवर, कोटा वादावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन केले.

सोमवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी-सपा प्रमुखांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी कोटा प्रश्नावर तसेच सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाच्या समाजाच्या मागणीवर पवारांची भूमिका जाणून घेण्यात आली. 


 आरक्षण देताना ५० टक्के कोट्याची मर्यादा मोडता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने (आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यात) अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे योग्य धोरण तयार करण्याची जबाबदारी केंद्रावर आहे,” असे केरे पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांना सांगितले. केंद्राचे धोरण बदलण्याची गरज असल्याचे सांगत  जर त्यांनी पुढाकार घेतला तर विरोधक सहकार्य करतील, असे देखील पवार यांनी सांगितले. 


 मराठा आंदोलकांच्या संतापाचा सामना केल्यानंतर पवारांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण (कोटा) प्रश्न सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावण्याची सूचना केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना योग्य वाटेल अशा नेत्यांना निमंत्रित करावे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्हीही उपस्थित राहू आणि सहकार्य करू,” असे पवार यांनी म्हटले. या बैठकीत मनोज जरांगे आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांना आमंत्रित केले पाहिजे अशी सूचना देखील त्यांनी केली. 



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)