लोकमान्य गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी Science (IT) आणि Commerce (IT) चे वर्ग सुरू
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप घरत व त्यांच्या पत्नी डॉ. मंजिरी घरत, माजी कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी व त्यांच्या पत्नी शुभदा पावगी अशा उभयतांच्या हस्ते श्री गणेश सरस्वती व भारतमाता पूजन करून करण्यात आले.
या शैक्षणिक वर्षापासून लोकमान्य गुरुकुलाचे अकरावी Science (IT) आणि अकरावी Commerce (IT) चे वर्ग सुरू होत आहेत. या कार्यक्रमाला टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे, उपाध्यक्ष अर्चना जोशी, कोषाध्यक्ष राजेंद्र कामतेकर, कार्यवाह नितेश्री काबाडी व रुपाली साखरे, संस्था सदस्य महेश नाईक व सदस्या डॉ. कोमल साखळकर असे सर्व कार्यकारी मंडळातील पदाधिकारी तसेच मंडळाचे अन्य सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.
लोकमान्य गुरुकुल शाळेला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ संगीत प्रशिक्षका शुभदा पावगी यांच्या हस्ते गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.