तिकीटासाठी सुट्टे पैसे न दिल्याने तिकीट काउंटरवर भांडण

Maharashtra WebNews
0

 



डोंबिवली ( शंकर जाधव )  : कल्याण स्टेशनमधील तिकीट काउंटरवर महिला कर्मचाऱ्याचा प्रवासी महिलाबरोबर वाद झाल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला होता. या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

यावेळी इतर प्रवासी वर्गाने गोंधळ घातल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मध्यस्थी केली.कल्याण रेल्वे स्टेशनच्या सात नंबर प्लॅटफॉर्म वरील स्कायवॉक वर असलेल्या तिकीट काउंटर वरली घटना घडली आहें. 


तब्बल अर्धा तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काउंटरवरील स्टाफचा वाद मिटला.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)