देश वायनाडमधील आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी

Maharashtra WebNews
0







पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला 


वायनाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते म्हणाले की, या दु:खद प्रसंगी केंद्र सरकार आणि देश आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले. 

 पाहणी दौऱ्या दरम्यान पंतप्रधानांनी केंद्र सरकार वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांच्या मदतकार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मदत आणि बचावकार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीचा सामना करू शकतील अशा सर्व केंद्रीय यंत्रणा तैनात करण्यात आल्या असून, त्या आपत्तीग्रस्तांना सहाय्य करत आहेत. पंतप्रधानांनी आपत्तीग्रस्त भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, राज्य पोलीस, स्थानिक वैद्यकीय दल, स्वयंसेवी संस्था आणि इतर सेवा-केंद्रित संस्थांच्या पथकांची प्रशंसा केली. त्याचबरोबर  वायनाडमधील बचाव कार्यावर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा निधी यापूर्वीच जारी करण्यात आला असून, उर्वरित निधीही तातडीने जारी केला जाईल, असे ही ते म्हणाले.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)