डायमंड इम्प्रेस्ट लायसन्सची सुविधा सुरू करणार

Maharashtra WebNews
0

 




४०व्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोदरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा


मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथे ४० व्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. यावेळी गोयल यांनी रत्ने आणि आभूषण निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता डायमंड इम्प्रेस्ट लायसन्स सुरू करणार असल्याचे  सांगितले. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव येथे १३ ऑगस्ट दरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे.


डायमंड इम्प्रेस्ट लायसन्सचा फायदा एमएसएमई, अर्थात सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांमधील निर्यातदारांना होईल. भारतातील रत्न आणि आभूषणे निर्यातीमध्ये एमएसएमई  उद्योगांचा मोठा वाटा आहे. डायमंड इम्प्रेस्ट परवाना हे सुनिश्चित करतो की, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त हिरे निर्यातीची उलाढाल असलेल्या भारतीय हिरे व्यापार्‍यांना मागील तीन वर्षांच्या सरासरी निर्यात उलाढालीच्या किमान ५%, (जर नसेल, तर पूर्वीप्रमाणे १०%) आयातीची परवानगी दिली जाईल.


भारतात सोने आणि दागिन्यांची आयात अधिकृत माध्यमांद्वारे होईल, आणि आपल्या देशातील कामगारांना काम मिळेल. जागतिक मंदीमुळे निर्यातीमध्ये झालेला तोटा भारताची देशांतर्गत बाजारपेठ लवचिकतेने भरून काढत आहे आणि वेगाने विकसित होत आहे. रत्न आणि आभूषण  निर्यातदारांनी सकारात्मक रहावे असे आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले.






गोयल म्हणाले, "भारत सरकार G7 देशांबरोबर सक्रियपणे काम करत असून, संबंधित केंद्रीय मंत्री वाटाघाटींमध्ये सहभागी झाले आहेत. आम्ही युरोपियन युनियनचे मंत्री आणि आयुक्तांशी  विस्तृत चर्चा करत आहोत. पारदर्शकता, डेटा संरक्षण आणि खर्चाचे मुद्दे आहेत. मात्र भारताची  G7 देशांबरोबर पूर्ण क्षमतेने वाटाघाटी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.”


आम्हाला आशा आहे की मुंबई किंवा सुरतमध्ये अँटवर्पमधील केंद्रासारखे केंद्र असावे. हिऱ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही डी बियर्स किम्बर्ले प्रोसेसबरोबर देखील चर्चा करत आहोत. तथापि, या संदर्भात कोणतीही तांत्रिक यंत्रणा आणि कोणताही प्रोटोकॉल (शिष्टाचार) नसून, आम्ही यासाठी संयुक्तपणे काम करत असल्याचे गोयल म्हणाले.


रत्ने आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष विपुल शाह यांनी सरकार, मंत्री आणि मंत्रालयाच्या पुढाकाराची प्रशंसा केली, ज्यामुळे भारत-संयुक्त अरब अमिरात CEPA, भारत-ऑस्ट्रेलिया ECTA, भारत-EFTA TEPA, यासारख्या परराष्ट्र  व्यापार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.भारत-संयुक्त अरब अमिरात CEPA मुळे युएईमध्ये होणार्‍या रत्न आणि दागिने निर्यातीत ४०% इतकी वाढ झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)