धैर्यशील पाटील यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल

 


रायगड ( धनंजय कवठेकर) : दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष, रायगडची मुलुखमैदान तोफ, सर्वसामान्य जनतेचे लढवय्ये नेते आदरणीय धैर्यशील पाटील हे लवकरच राज्यसभेचे सदस्य म्हणून सर्वसामान्य जनतेचा आवाज दिल्लीत बुलंद करणार आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 


त्याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देतांना भाजप नेते दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ झिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश माने, भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य रविंद्र म्हात्रे, रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयवंत अंबाजी, भाजप रोहा मंडल चिटणीस मिथुन सर्लेकर, अलिबाग मुरूड विधानसभा संयोजक फ्रेंड्स ऑफ बीजेपी  पंकज अंजारा, भाजप कार्यकर्ते सत्यवान पेटारे हे सहकारी उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post