अखेर भारत - पाकिस्तान सामने होणारच



चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाणार

 तीन वर्षांतील भारत - पाकिस्तान सामन्याचे ठिकाण ठरले


 चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आयोजनावरून PCB आणि BCCI यांच्यात सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे.  अहवालानुसार, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हायब्रिड पद्धतीने खेळविण्यात होकार दिला आहे.  मात्र, यासोबतच पीसीबीने स्वत:च्या काही अटीही घातल्या आहेत.  पीसीबीची सर्वात मोठी अट आहे की जर भारतीय संघ पाकिस्तानात येणार नसेल तर त्यांचा संघही भारतात जाणार नाही.  अशा स्थितीत आगामी तीन वर्षांत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणारे सामने दुबईत खेळविले जातील. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार होते. त्याचबरोबर हे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे आयोजित केली जाणार होती.


भारतीय क्रिकेट संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळणार होता पण बीसीसीआयने आपला संघ पाठवण्यास नकार दिला. क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, दुबईत केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बरोबरच इतर सामने देखील खेळविले जाणार आहेत.  महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ आणि पुरुषांचा T२० विश्वचषक २०२६ यासह आयसीसी इव्हेंट्स दुबईमध्ये खेळविले जाऊ शकतात. महिलांची स्पर्धा संपूर्णपणे भारतात आयोजित केली जाणार आहे. 



 पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने क्रिकेट पाकिस्तानला सांगितले की, आम्हाला पैसे नको आहेत; आम्हाला आदर हवा आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात होणााऱ्या आयसीसी स्पर्धा वेळेत खेळविण्यावर आयसीसी भर देत असून त्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधत आहेत. 


 

Post a Comment

Previous Post Next Post