राष्ट्रपती कार्यालयाकडून निमंत्रित
डोंबिवली ( शंकर जाधव) : तब्बल ४१ वर्षे रुग्णसेवा करणारे.एक अभ्यासू आयुर्वेदाचार्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणा-या वैद्य विनय वेलणकर यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला ग आहे.
१५ ऑगस्ट आपल्या भारतभूचा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष आयुर्वेदाचार्य वैद्य विनय वेलणकर यांना १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीत संपन्न होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाकडून विशेष आमंत्रण आले आहे.संपूर्ण देशभरातून केवळ २००( दोनशे) जणच निमंत्रित आहेत.त्या २०० जणांत वैद्य विनय वेलणकर यांचा समावेश आहे.संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी ही घटना आहे..!
गेल्या ४० वर्षात वैद्य वेलणकरांनी हजारोंच्या संख्येने रुग्णांवर उपचार केले आहेत व करीत आहेत.पंचकर्म चिकित्सा पद्धतीचे जनक.हजारोंच्या संख्येने आरोग्यविषयक व्याख्याने देवून आरोग्य जनजागृती करणारे प्रगल्भ व्याख्याते.आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणारे निस्सीम साधक.पारदर्शी लेखक.चिंतनशील समाजसेवक.कुशल संघटक.आयुर्वेदा संदर्भातील अनेक संस्थांचे.आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी.. प्रतिष्ठीत संस्थांचे पुरस्कार मिळविणारे मानकरी..करोना काळात एकही दिवस दवाखाना बंद न ठेवता अथकपणे रुग्णसेवा करणारे धन्वंतरी..! अश्या अनेक निस्वार्थी कार्याची दखल राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाने घेतली असून वैद्य विनय वेलणकर यांना स्वातंत्र्यदिनासाठी सन्मानाने निमंत्रित केलेले आहे.
Hearty Congrats! U deserve it! 💪
ReplyDelete