अलिबाग ( धनंजय कवठेकर) : साळाव खाडीपूल ते रोहा या रस्त्याची दुरवस्था झालेली असून,अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास आणि वाहनांस धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याबाबत दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष तथा,१९२-अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर करत त्यांचे या समस्येकडे लक्ष्य वेधले. जिल्हाधिकारी महोदयांच्यावतीने उपजिल्हाधिकारी(सा. प्र.) रवींद्र शेळके यांनी निवेदन स्वीकारले.पुढील दोन दिवसांत ह्या समस्येचे निराकरण न केल्यास स्वतःच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याबाबत प्रशासनाला सूचित करण्यात आलेले आहे.
यावेळी, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर, १९२ अलिबाग-मुरूड-रोहा मतदारसंघ सोशल मीडिया सदस्य स्वप्नील चव्हाण, १९२ अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघ सहसंयोजक सुरेश म्हात्रे, ग्रुपग्रामपंचायत साळाव सरपंच वैभव कांबळी, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते जयवंत चवरकर, आदिनाथ सानेकर आणि अन्य सहकारी उपस्थित होते.