Hasina shaikh stay india : हसीना शेख भारतात राहणार

Maharashtra WebNews
0





नवी दिल्ली :  बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बहिण शेख रेहानासोबत देश सोडून भारतात आल्या. शेख हसीना यांना बांगलादेश लष्कराकडून ४५ मिनिटांत देश सोडण्याचा अल्टिमेटम मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना या दिल्लीहून लंडनला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र सध्या त्या नवी दिल्लीत राहणार असल्याचे त्यांच्या मुलाने स्पष्ट केले आहे. 


हसीन शेख  यांनी बांगलादेश सोडल्यानंतर प्रथम त्या हेलिकॉप्टरने त्रिपुरातील आगरतळा आणि तेथून भारतीय लष्कराच्या विमानात गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर आल्या. तेथून त्यांना दिल्लीत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आधी दिल्लीहून लंडनला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता, पण आता त्या प्लानमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.  शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी याबाबत बोलताना सांगितले की, त्यांची आई सध्या भारतातच राहणार आहे. सध्या त्याचा भारत सोडण्याचा कोणताही विचार नाही. शेख हसीना यांना यावेळी सुरक्षित ठिकाणी राहायचे असून त्या दिल्लीत सुरक्षित ठिकाणी राहत आहेत.  दिल्लीहून लंडनला जाण्याची त्यांची  योजना होती. मात्र शेख हसीना यांना लंडनमध्ये राहण्यासाठी यूके सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नसल्यामुळे त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे. 


हसीना यांची कन्या सायमा वाझेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रासाठी प्रादेशिक संचालक आहेत, ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. युनायटेड किंगडमने तिला आश्रय देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हसीनाच्या लंडनला जाण्याच्या योजनेत अडथळा निर्माण झाला आहे. रेहानाची मुलगी ट्यूलिप सिद्दीक ही ब्रिटिश संसद सदस्य आहे.


बांगलादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीकडे पाहता जॉय यांनी  राजकारणात येण्याची कोणतीही सध्या योजना नसल्याचे सांगत आमच्या कुटुंबाविरुद्ध सत्तापालट होण्याची ही तिसरी वेळ असल्याचे देखील त्यांनी सांगितले. हसीना वगळता त्यांचे सर्व कुटुंबीय आधीच परदेशात दीर्घकाळ राहून आपापल्या जीवनात स्थिरावले असल्याचे जॉय यांनी म्हटले आहे.  




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)