विधानसभा - महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) :  आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकारी तसेच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक डोंबिवली आप (पश्चिम ) महिला अध्य्क्ष रेखा रेडकर यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लादणार असल्याची घोषणा करण्यात आली. 


यावेळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या आप सरकारची कॉपी करून लाडकी बहीण सारख्या योजना महाराष्ट्र राज्यात घोषणा करत आहे. तर लवकरच कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आम आदमी पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार अशी माहिती कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी दिली. येत्या निवडणुकीत आप पक्ष शहरातील सुशिक्षित तसेच तरुण वर्गाला निवडणुकीत संधी देणार असल्याचे आप पश्चिम महिला अध्यक्ष रेखा रेडकर यांनी सांगितले सदर बैठकीत आप प्रदेश उपाधयक्ष धनंजय शिंदे ,कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय जोगदंड ,डोंबिवली पश्चिम महिला अध्यक्षा रेखा रेडकर ,युथ विंग चे राहुल दत्ता,रिक्षा यूनीयन अध्यक्षा प्रियांका पाटील , डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष अवधूत  दीक्षित , व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post