रावळपिंडी : बांगलादेशने सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा २-० असा धुव्वा उडवला. बांगलादेशने पहिली कसोटी १० गडी राखून जिंकली. दोन्ही सामने रावळपिंडीत झाले. बांगलादेशने पाकिस्तानवर शेवटची कसोटी जिंकून या कसोट इतिहासात पहिला विजय मिळवला होता. आता कसोटी मालिकाच आपल्या नावावर करून प्रशंसा मिळवली आहे.
बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या डावात १२ धावांची आघाडी मिळवली होती. पाकिस्तानने दुसऱ्या डावात १७२ धावा केल्या आणि बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशने हे लक्ष्य चार गडी गमावून पूर्ण केले. लिटन दास या सामन्याचा हिरो ठरला, त्याने १३८ धावा केल्या. लिटन दासने हसन मिराजसह बांगलादेश संघाची धुरा सांभाळली.
बांगलादेश संघ २००० पासून कसोटी खेळत आहे. तेव्हापासून, दोन किंवा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत केवळ चार वेळा विरुद्ध संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानपूर्वी बांगलादेश संघाने २००९ (२-०) आणि २०१८/१९ (२-०) आणि २०१४/१५ मध्ये झिम्बाब्वे (३-०) मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. याशिवाय बांगलादेशने २०२२/२३ मध्ये आयर्लंडचा, २०१९/२० मध्ये झिम्बाब्वेचा आणि २०२१ मध्ये झिम्बाब्वेचा एका कसोटी मालिकेत पराभव केला होता.
दोन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीपचा सामना करण्याची ही कसोटीतील १७ वी वेळ आहे. मायदेशात, पाकिस्तानला दुसऱ्यांदा दोन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी २०२२/२३ मध्ये इंग्लंडने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला होता.

