शिर नसलेल्या मृतदेहाच्या खुनाचा २४ तासात लावला पोलिसांनी छडा
छत्रपती संभाजीनगर : मैत्रीला काळिमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात एका तरुणाचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा छडा लावून एकाला ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट करत या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
धुळे-सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात राजू किसन कापसे (वय ३५) या युवकाचा शिर नसलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या गुन्हाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी संतोष उद्धवराव जगताप यास ताब्यात घेतले असून दत्ता सुरवसे हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मयत राजेश कापसे याचे दत्ता अमृतराव सुरवसे याच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच रागातून दत्ता सुरवसे आणि संतोष जगताप यांनी राजेश कापसेचा धारदार चाकूने गळा कापून ठार केल्याचे समोर आले. तसेच घटनेच्या दिवशी दत्ता सुरवसे याच्यासोबत संतोष उधवराव जगताप हा असल्याचे उघडकीस आले. त्यावरून संतोष जगताप यास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता या प्रकरणाचा छडा लागला. गुन्ह्यातील आरोपी दत्ता अमृतरा सुरवसे याचा शोध व गुन्हाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट करत या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी सतिष वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे करमाड व स्थानिक गुन्हे शाखा येथील एकूण पाच पथके नेमले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. सुधीर मोटे, पवन इंगळे व पोलीस अमलदार यांनी तपासास सुरवात करत नातेवाईकांची कसोशीने चौकशी केली.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक, डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, छत्रपती संभाजीनगर सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ, सपोनि. प्रताप नवघरे, पो.स्टे. करमाड, स्था.गु.शाखा, स.पो.नि. सुधीर मोटे, पवन इंगळे, पो.उपनि.दादाराव बनसोडे, रामेश्वर ढाकणे, स्था.गु.शाखेचे पोलीस अंमलदार-स.फौ. थोटे, पोहेकॉ/ संजय घुगे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, रवि लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे पो.स्टे.करमाड पोहेकॉ / शिवाजी मदेवाड, पोना. गित्ते, सुनिल गोरे, दादा पवार, संजय जगताप, नागलोत यांनी केली.