sitaram yechury : ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन

Maharashtra WebNews
0


नवी दिल्ली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.  त्यांना नुकतेच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.


७२ वर्षीय सीपीआय(एम) नेते सीताराम येचुरी यांना यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली.


सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस आणि पक्षाच्या संसदीय गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना २०१६ मध्ये राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये असताना त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ते सलग तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.  १९८४ मध्ये त्यांना सीपीआय(एम) च्या केंद्रीय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले. २०१५ मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली.  

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)