Congress: कल्याण पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे नविन सिंग इच्छुक

 



    आयटी पार्क करून तरुणांना रोजगार देणार 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवारी कधी जाहीर करील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून काँग्रेसने निवडणूक लढवावी अशी मागणी करत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश नागरी विकास सेल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड.नवीन सिंग यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे या मतदार संघात उमेदवारी मिळावी याकरता निवेदन दिले आहे. तरुणांना रोजगाराची संधी मिळावी याकरता सरकारकडे मागणी करणार असल्याचे सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


   डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश नागरी विकास सेल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड.नवीन सिंग यांच्या वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, सचिव प्रशांत जोशी, उपाध्यक्ष महावीर बडाला यांनी स्वागत केले.

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश नागरी विकास सेल अध्यक्ष तथा कडोंमपा माजी नगरसेवक ॲड.नवीन सिंग यांनीही १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर यावेळी सांगितले. पुढे  सिंग म्हणाले, त्यांच्या राजकिय कार्याचा व कल्याण पूर्व मतदार संघातील नागरिकांच्या समस्यांवर सविस्तर माहिती दिली.

 ते म्हणाले, यावेळी महायुती सरकार नाही तरमहाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल.तरुणांचा रोजगार प्रश्न सुटणार असून आयटी पार्कसाठी पाठपुरावा करू. कल्याण पूर्वे विधानसभा मतदारसंघात पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी नागरिक हवालदिल आहेत. मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी लोकांनी उच्चशिक्षित उमेदवारालच पसंती दिली पाहिजे असे मतही यावेळी सिंग व्यक्त केले. राजकीय कारकीर्द सुरु होण्याआधी  पेंटर, इस्टेट कन्सल्टंट, लेबर आदी कामे करून पुढे उच्चशिक्षित झालो. पुढे  राजकीय क्षेत्रात काम करताना समाजकारण या मुद्यांवर सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहून मला जमेल त्या पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. माझी जन्मभूमी जरी यूपी असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. येथील प्रत्येक सण-उत्सवात स्वतः सामावून गेलो त्यामुळे येथील सर्वच लोकांशी जवळचे नाते जडले आहे. सिंग यांनी मनसेबाबत बोलताना मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Post a Comment

Previous Post Next Post