डोंबिवलीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

 



 २३ वर्षांपसून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजू शेख 


डोंबिवली ( शंकर जाधव) लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातसर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. मंडळाचे अध्यक्ष कधी बदलतात तर काही मंडळे स्थापने पासूनच जो अध्यक्ष निवडतात त्यालाच पुढे ही धुरा सांभाळायला देतात. आता हा अध्यक्ष इतर जातीधर्माचा असला तरी त्याला आपल्यालाच आहे असं समजून गुण्यागोविंदाने उत्सव साजरा करतात. डोंबिवलीतील शिव शंकर मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षपद मुस्लिम समाजातील एका माणसाकडे आहे. 



डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील शिवशंकर नगर मित्र मंडळ गेली १८ वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळाचा अध्यक्ष आहे राजू शेख आहेत.राजू शेख हे मंडळातील कार्यकर्त्यासोबत गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पासून ते गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन करेपर्यत काम करतात. एवढेच नव्हे तर आरतीही करतात, शेख यांच्या बरोबर परिसरातील हिन्दू सोबतच इतर मुस्लिम समाजातील बांधवही गणरायाची भक्तिभावाने पूजा करतात. आरती करतात सामाजिक सलोखा व जगात सुख व शांती असावी असे श्री गणेशाकडे प्रार्थना असल्याचे शेख म्हणाले.शिवशंकर नगर मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मुस्लिम बंधन आरती करताना भाजपा कल्याण निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सचिव मुकेश सेंघानी आदी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post