राजेश मोरे यांची दिव्यातील विविध गणपतींना भेटी

 



कल्याण ग्रामीणमधील विधानसभेचे इच्छुक उमेदवार 

दिवा (आरती मुळीक परब) :  कल्याण ग्रामीणमधील विधानसभेसाठी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार राजेश मोरे यांनी दिव्यातील विविध राजकीय नेत्यांच्या घरगुती गणपतींना भेटी देऊन पूजा अर्चना केली. या भेटींमधून ते जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवत असल्याने शिवसेनेचे कार्यकर्तेही आनंदीत आहेत.


येणाऱ्या विधानसभा निवडणुकी अगोदरचा हा शेवटचा गणेशोत्सव असल्याने त्याचा या निवडणुकीत काही इच्छुक उमेदवार प्रभावीपणे वापर जनसंपर्कासाठी करून घेताना दिसत आहे. तर कल्याण ग्रामीण मधून शिंदे गटाकडून राजेश मोरे हे इच्छुक उमेदवार असल्यामुळे त्यांनी कल्याण ग्रामीण मधील महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या घरगुती गणपतींना आज उपस्थिती दाखवली. तसेच विधानसभेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणीही या गणेशत्सोवातून गाठी भेटीतून त्यांनी सुरू केल्याचे समजते आहे. त्यात शिवसेना, मनसे कल्याण ग्रामीण मध्ये आघाडीवर असून इतर पक्षांचे इच्छुक पिछाडीवर आहेत.


दिवा शहरातील पश्चिमेत असणाऱ्या दिवा गावातील शैलेश पाटील, माजी नगरसेवक, शैलेश भगत, माजी परिवहन सभापती, सौ. दर्शना चरणदास म्हात्रे, माजी नगरसेविका, दीपक जाधव, माजी नगरसेवक, आदेश भगत, उपशहर प्रमुख, भालचंद्र भगत, विभाग प्रमुख, उमेश भगत, विभाग प्रमुख यांच्या गणपतींना भेटी देऊन दर्शन घेतले. या घरगुती गणेश दर्शनाच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी राजेश मोरे घेत आहेत.





Post a Comment

Previous Post Next Post