Nashik car accidnt : नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू




एक जण गंभीर जखमी; अज्ञात वाहनचालक फरार


नाशिक:  नाशिक जिल्ह्यातील अहमदनगर-मनमाड महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. एका ह्युंदाई कारला अज्ञात वाहनाने धडक देऊन तेथून पळ काढला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे शुक्रवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. नगर-मनमाड महामार्गावर अज्ञात वाहनाने एका हुंडाई कारला मागून धडक दिली. त्यामुळे ह्युंदाई कार ३० ते ४० फूट अंतरावर रस्त्याच्या कडेला पडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचे मृतदेह कारमध्ये अडकले. अपघातग्रस्त कारचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. आकाश रमेश पवार आणि नीलेश दगू शेवाळे अशी मृतांची नावे आहेत. तर शुभम गंगाधर पानमाळे हा गंभीर जखमी आहे. अपघाताच्या वेळी शुभम कार चालवत होता.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. शुभम पानमाळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post