Navi mumbai : ऐरोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई



  नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केली. 

         नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं - ३० ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव,सेक्टर – ९, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.


  सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावू शकत नसल्याने या मोहिमेसाठी १० हॅमर, ७ ब्रेकर, व १६ मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post