डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानामध्ये विराजमान झालेल्या गणरायाच्या आरतीचा मान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यामुळे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांना मिळाला. हे मी माझं भाग्य समजतो. यावेळी बाप्पाची मनोभावे आरती केली व दर्शन घेतल्याचे मोरे यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे , कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप शहरप्रमुख गजानन व्यापारी, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे स्विय सहायक अभिजीत दरेकर , जितेन पाटील,उमेश शेलार व पदाधिकारी उपस्थित होते.