दिवा \ आरती परब : दिवा विकास प्रतिष्ठानच्या गुरु दर्शन नगर येथील नवीन शाखेचे उद्घाटन माजी नगरसेवक व शिवसेना उपशहरप्रमुख तसेच दिवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंब्रा देवी कॉलनीतील गुरु दर्शन नगर येथील रहिवाशांच्या आग्रहाखातर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत तोडगा निघावा आणि नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गुरुदर्शन नगर येथे ही शाखा सुरू करण्यात आल्याचे समाजसेवक कैलेश पाटील यांनी सांगितले.
दिवा विकास प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य प्रतिष्ठान करत असून, या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. गुरुदर्शन नगर येथील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.