मृतांची संख्या १२ झाली
लेबनॉन : लेबनॉनमध्ये इस्रायलच्या पेजर हल्ल्यातील मृतांची संख्या १२ झाली असल्याची माहिती खुद्द हिजबुल्लान दिली आहे. हिजबुल्लाहने म्हटले आहे की त्याचे आणखी तीन सदस्य एका रात्रीत मरण पावले आणि मृतांची संख्या १२ झाली. याशिवाय ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या लढाईत मारल्या गेलेल्या इस्रायलच्या ४५३ सदस्यांची नावेही हिजबुल्लाहने उघड केली आहेत. लेबनॉनमधील हल्ल्यानंतर हिजबुल्लाहनेही घोषणा केली की, इस्त्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांचे सैनिक तयार आहेत. आता लवकरच इस्रायलवर मोठा हल्ला होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लेबनॉनमधील या हल्ल्याबाबत (लेबनॉनमधील पेजर अटॅक) इराणचे संयुक्त राष्ट्राचे राजदूत अमीर-सईद इरावान यांनी मंगळवारी यूएन जनरल असेंब्लीच्या तातडीच्या बैठकीला संबोधित करताना म्हटले की, बेरूतमधील दळणवळण यंत्रणा नष्ट करण्यात आली असून त्यात राजदूतासह हजारो लोक जखमी झाले असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या मंगळवारी रात्री इस्रायलने लेबनॉनमध्ये सायबर हल्ला (पेजर हल्ला) केला. इस्त्राईलने हिजबुल्लाहचे हल्ले थांबवणे हे त्याच्या मुख्य युद्ध उद्दिष्टांपैकी एक असल्याचे सांगत हा हल्ला झाल्याचे म्हटले. त्याचबरोबर माजी वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध हिजबुल्लाहच्या हत्येचा प्रयत्न हाणून पाडल्याचे देखील स्पष्ट केले.