प्रमाणपत्र देऊन सन्मानित
दिवा,( आरती परब ) : गणेशोत्सवात विसर्जनावेळी होणारी गर्दी आटोक्यात आणणे, गणपतीची मूर्ती विसर्जनाला आणल्यावर त्यांना मदत करणे, त्या भागातील वाहतूक कोंडी सोडवणे, नागरिकांना मदत करणे अशी मदतीची कामे पोलिसांसोबत करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकारी संघटना अंतर्गत ठाणे जिल्हा आणि दिवा शहरतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यात ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शर्मिला म्हात्रे, ठाणे जिल्हा समन्वय अजय म्हात्रे, दिवा शहर अध्यक्ष ज्योती घाडीगावकर, कार्याध्यक्ष किशोरी घाडीगावकर, जनसंपर्क प्रमुख दिपाली उदेग ,संपर्कप्रमुख भारती कांबळे, मनाली उगवे, सरचिटणीस दूर्वा नेवरेकर, सहसचिव रवींद्र पवार, रुपेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले. दिवा शहरातील पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकारी संघटनेतील सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने अनेक प्रकारची समाजसेवा करण्यात येते.
