Next Chief Justice : देशाचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना ?

 


सध्याचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची केंद्र सरकारकडे शिफारस 


नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील.  सध्याचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती खन्ना यांना पुढील सरन्यायाधीश बनवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.  केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास न्यायमूर्ती खन्ना १० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. सध्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड त्याच दिवशी निवृत्त होत आहेत.  न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ २३ मे २०२५ पर्यंत असेल. 

केंद्र सरकारने, प्रस्थापित नियमांनुसार, गेल्या शुक्रवारी CJI यांना त्यांच्या उत्तराधिकारीचे नाव सुचविण्याची विनंती केली होती. त्याला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ही शिफारस केली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारतीय न्यायव्यवस्थेतील निःपक्षपातीपणा आणि कायदेशीर विद्वत्ता यासाठी ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले. न्यायमूर्ती खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हंसराज खन्ना यांचे पुतणे आहेत. 

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला. CJI चे वडील न्यायमूर्ती देव राज खन्ना हे देखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई सरोज खन्ना या LSR DU मध्ये लेक्चरर होत्या. येथूनच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९८० मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी डीयूमधून कायद्याला प्रवेश घेतला. 

Post a Comment

Previous Post Next Post