मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कारागिरीचा ध्यास असलेल्या 'बिष्मिता ज्वेल्स क्रिएशन' या उदयोन्मुख डिझायनर ज्वेलरी ब्रँडला यंदा ठाण्यातील 'संकल्प प्रतिष्ठान'च्या दुर्गा पूजा उत्सवात देवीच्या दैनंदिन सजावटीसाठी दागिने डिझाइन करण्याचे अभिमानास्पद काम सोपवण्यात आले आहे. 'बिष्मिता ज्वेल्स क्रिएशन'चे मालक बिस्वनाथ सांत्रा यांची अतूट भक्ती आणि कौशल्य याची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठाणे येथे दुर्गापूजा सोहळ्यादरम्यान आयोजित समारंभात त्यांचा वैयक्तिकरित्या गौरवही केला.
देवीसाठी मुकुट, बांगड्या, हार आणि कानातले यांसारख्या उत्कृष्ट वस्तू तयार करण्याची जबाबदारी बिस्वनाथ सांत्रा यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'मोस्ट क्रिएटिव्ह ज्वेलरी ब्रँड' अर्थात 'सर्वांत अभिनव ज्वेलरी ब्रँड'चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कामगिरीने 'बिष्मिता ज्वेल्स क्रिएशन'ने पुढे भारतातील अग्रगण्य ज्वेलरी डिझायनर म्हणून त्यांचे स्थान एकप्रकारे निश्चित केले आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, आमदार आदरणीय रवींद्र फाटक यांच्या शिफारशीवरून हा सन्मान देण्यात आला आहे.
बिस्वनाथ सांत्रा यांचा प्रवास असाधारण धैर्य, विश्वास आणि चिकाटीने भरलेला आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील एका खेड्यातील रहिवासी असलेल्या बिस्वनाथ यांचे डॉक्टर बनण्याचे किंवा कौटुंबिक व्यवसाय चालवण्याचे नव्हे, तर दैवीचे सौंदर्य प्रकट करणारे दागिने तयार करणे, हे त्यांचे स्वप्न होते. १९९३च्या विनाशकारी मुंबई हल्ल्यांनंतर केवळ ३६५ रुपये घेऊन बिस्वनाथ यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
बिस्वनाथ यांची चिकाटी आणि परिश्रम आदींवर भाष्य करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की 'विनम्र सुरुवातीपासून ते एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर बनण्यापर्यंत, ते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत. आपल्या संस्कृती आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करताना आज मला अभिमान वाटत आहे'.
आज बिस्वनाथ सांत्रा यांच्या उद्योगामध्ये १०० ते १५० हून अधिक कारागीर आहेत, जे पारंपरिक भारतीय दागिन्यांच्या विकासात योगदान देत आहेत. गरिबांना देणगी देण्यापासून ते दरवर्षी काली मातेच्या पूजेपर्यंत, परोपकारासाठीची त्यांची बांधिलकीदेखील अत्यंत प्रशंसनीय आहे. आपल्या गावी मुलांसाठी आश्रम स्थापन करण्याचे आणि त्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हे त्यांचे समाजासाठी आजीवन योगदान देण्याची वचनबद्धता दर्शवते.
महाराष्ट्रातील लोकांचा आणि पूजा समितीचा अखंड पाठिंबा मिळाल्यानंतर 'बिष्मिता ज्वेल्स क्रिएशन'चे संस्थापक श्री. बिस्वनाथ सांत्रा म्हणाले, की 'माता दुर्गेची दैवी शक्ती आणि कृपेसाठी मी सर्वस्वी ऋणी आहे. माझा प्रवास संघर्षाने भरलेला आहे; परंतु मी शिकलो आहे की चिकाटी आणि विश्वास चमत्कार करू शकतात. मला पुरस्कार देऊन सन्मानित केल्याचा विशेष अभिमान वाटतो. हा सन्मान मी माझ्या टीमला, माझ्या कुटुंबाला आणि मी दररोज काम करत असलेल्या गरिबांच्या स्वप्नांना समर्पित करतो. तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम हेच एक शक्तिशाली साधन असू शकते.'
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी बिस्वनाथ सांत्रा यांचा उद्योजकीय प्रवास पाहून आपल्या भावना व्यक्त केल्या. 'बिस्वनाथ यांचे कार्य हे स्वप्नांच्या आणि समर्पणाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. यंदाच्या वर्षीच्या दुर्गापूजेत त्यांचे योगदान खरोखरच अप्रतिम आहे आणि मला अभिमान आहे की एका सामान्य व्यक्तीला हा अनोखा सन्मान मिळाला आहे.'
मुंबईच्या प्रसिद्ध झवेरी बाजारात दागिने कारागीर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर बिस्वनाथ सांत्रा यांना १९९४ ते २००४ दरम्यान १० वर्षे नैराश्याचा सामना करावा लागला, ज्यासमोर त्यांना जवळजवळ हारच पत्करावी लागली. त्यांनी भाडेतत्त्वावरील कार उद्योगात एक छोटासा प्रवेश केला, परंतु वैयक्तिक संघर्षाच्या वेळी दैवी हस्तक्षेपाने त्यांना नवीन आशा दिली. २००५ मध्ये त्यांनी पुन्हा दागिने बनवण्याची आवड जोपासली आणि २००६ पर्यंत त्यांनी 'आस्था ज्वेलरी' हा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे जमा केले. आता उत्कृष्ट कारागिरी आणि वैयक्तिक घडणावळीशी संबंधित असलेला 'बिष्मिता' ब्रँड सध्या यशस्वीपणे चालू आहे.
आपल्या प्रवासात आतापर्यंतच्या यशासह बिस्वनाथ सांत्रा आपल्या व्यवसायासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी स्वप्ने पाहत आहेत. हे सुनिश्चित करत आहे की, कारागिरी आणि परंपरेचा वारसा पिढ्यान्पिढ्या पुढे जाईल. त्यांचा व्यवसाय नवीन उंचीवर नेणे आणि कर्मचाऱ्यांना समृद्ध करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.