दिवा, (आरती परब ) : ग्रीन व्हॅली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित "अभिष्कार बाल मेळा २०२४" मध्ये सात पारितोषिके जिंकून शाळेचे नाव उंचावले आहे. मोहिनी जे. गोशी, शिक्षिका श्रध्दा गोंजारे, प्रेरणा सौराष्ट्रे, जिया गोशी आणि कुंदा झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
गट अ अंतर्गत, नृत्य स्पर्धेत तिसरे पारितोषिक आणि नाटक स्पर्धेतही तिसरे पारितोषिक मिळवून विद्यार्थ्यांनी आपली कला सिद्ध केली. गट ब मध्ये नाटक स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळविले, तर नृत्य स्पर्धेत दुसरे पारितोषिक जिंकण्याचा मान मिळवला. एकल स्पर्धांमध्ये, गट अ च्या स्पेल बी स्पर्धेत दिप्तिमयी पटनायक (५ वी) हिने तिसरे स्थान मिळवले. गट ब मध्ये रोशन पाणिग्राही (८ वी) याने स्पेल बी स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळविले, तर दिव्या जयस्वाल (५ वी) हिने चित्रकला स्पर्धेत तिसरे पारितोषिक प्राप्त केले.
या उल्लेखनीय यशासाठी मोहिनी जे. गोशी, शिक्षिका श्रध्दा गोंजारे, प्रेरणा सौराष्ट्रे, जिया गोशी आणि कुंदा झांबरे यांनी मार्गदर्शन दिले. प्राचार्य जोसेफ गोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले. "शिक्षकांच्या समर्पणामुळेच विद्यार्थ्यांनी उच्च स्तरावर कामगिरी करून शाळेचे नाव उज्वल केले आहे," असे जेसेफ प्राचार्यांनी सांगितले. ग्रीन व्हॅली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हे यश प्रेरणादायी ठरले असून, शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्वासक आहे.



